मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

लातूर, दि. 2(जिमाका) : राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-2019 अंतर्गत एक नाविन्यपुर्ण योजना व कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म व लघु उपक्रमांचा चालना दिली जात आहे. याकरिता जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबविण्यात येत असून जात प्रवर्गउद्योग क्षेत्रानुसार अनुदान दिले जाणार आहे. तरी या योजनेचा जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निमित्ती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडून बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर 15 ते 35 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. जिल्ह्यातील स्थानिक असलेले किमान 18 ते 45 वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणारे उमेदवारविशेष प्रवर्गासाठी (अनुसूचित जातीअनुसूचित जमातीइतर मागास प्रवर्गमहिलादिव्यांगमाजी सैनिक) वयामध्ये 5 वर्षाची सवलत राहील. 10 लाख रुपयावरील प्रकल्पासाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व 25 लाख रुपयावरील प्रकल्पासाठी किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पासाठी रुपये 50 लाख आणि सेवा व कृषीपूरक उद्योग प्रकल्पासाठी कमाल रुपये 20 लाख प्रकल्प किंमत मर्यादा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जन्म दाखलाशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रवयाचा पुरावाशैक्षणिक पात्रतेसंबंधित कागदपत्रेआधारकार्डपॅनकार्डजातीचे प्रमाणपत्रफूड ऑन व्हील वाहतुकीसाठी परवानगी व वाहन चालविण्याचा परवानाग्रामीण भागासाठी लोकसंख्या प्रमाणपत्रप्रकल्प अहवालफोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेतअसे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांनी कळविले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित