लातूर जिल्हा परिषद गट- क संवर्ग परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 लातूर जिल्हा परिषद गट- क संवर्ग

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूरदि. 12 (जिमाका) : जिल्हा परिषदेतंर्गत गट-क संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया परीक्षा 13 जून 2024 ते 16 जून 2024 या कालावधीत आयोजित केलेली आहे. जिल्ह्यातील तीन उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून या सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याबाबतचे आदेश प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी संगीता टकले यांनी दिले आहेत.

नांदेड रोडवरील कोल्पा येथील सांदिपनी टेक्निकल कॅम्पसलातूर येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलटेक्निक आणि निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईलअसे कृत्य करता येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्सपानपट्टी टायपिंग सेंटरएसटीडी बुथध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोनसेल्यूलर फोनई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.

कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बांधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस अथवा वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारीकर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारीकर्मचारी यांच्याबाबत त्यांच्या परीक्षेसंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. 13 जून2024 ते 16 जून2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत