आजनसोंड येथे सापडलेल्या बालिकेच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 आजनसोंड येथे सापडलेल्या बालिकेच्या

पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

लातूर, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यातील आजनसोंड (ता. चाकूर) येथे आर्या ही 4 महिन्याची बालिका 8 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी सापडली आहे. लातूर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार तिला मदर तेरेसा शिशुगृहात ठेवण्यात आले आहे. ही बालिका ही गोऱ्या वर्णाची आहे.

या बालिकेचे जवळचे कोणी नातेवाईक किंवा आई-वडील असल्यास पुराव्यासह तीस दिवसाच्या आत बाल कल्याण समिती, मुलांचे निरीक्षण गृह, लेबर कॉलनी, लातूर (दूरध्वनी क्र. 02382-243543) किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, लातूर (भ्रमणध्वनी क्र. 9822137327) येथे संपर्क साधावा. मुदतीच्या आत संपर्क न साधल्यास या बालिकेचे कोणीही नातेवाईक व आई-वडील हयात नाहीत अथवा ते या बालिकेची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत, असे गृहीत धरून, दत्तकाची व पुनर्वसनाची कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार व आक्षेप चालणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत