छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शनाला निलंगा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शनाला

निलंगा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

 

लातूर, दि. 2(जिमाका) : निलंगा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 20 जून, 2024 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हे शिबीर घेण्यात आले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी या संस्थेचे प्राचार्य श्री. राजुकरजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कु. एम.आर. बोरुळकर तसेच गटनिदेशक एस.एस. जाधव व सर्व कर्मचारीवृंद यांनी प्रयत्न केले. या शिबिरासाठी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्यासह देवणीशिरुर अनंतपाळ व निलंगा तालुक्यातील आयटीआयमधील 600 विद्यार्थी उपस्थित होते.

*****


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत