महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 येत्या 10 नोव्हेंबर रोजी; महाटीईटीच्या संकेस्थळावर 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 येत्या 10 नोव्हेंबर रोजी;

महाटीईटीच्या संकेस्थळावर 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

 

लातूर, दि. 19 (जिमाका) :   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परिषदेवर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 घेण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. ही परीक्षा 10 नोव्हेंबर, 2024 रोजी घेतली जाणार आहे, असे पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त यांनी कळविले आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित,  विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत:  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवर्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशिल परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. 

या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर, 2024 पासून सुरु झाली असून 30 सप्टेंबर, 2024 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत असून प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची मुदत 28 ऑक्टोबर, 2024 ते 10 नोव्हेंबर, 2024 पर्यंत राहील. 10 नोव्हेंबर, 2024 वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 1 या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. I  घेतला जाणार आहे. तसेच 10 नोव्हेंबर, 2024 वेळ दुपारी 2 ते दुपारी 4.30 या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. II घेण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत