तेरणा नदी काठाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 तेरणा नदी काठाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

लातूर, दि.12 (जिमाका) :  निम्न तेरणा धरणाची (माकणी धरण) पाणी पातळी 603.55 / 604.40 मीटर असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 75.31 टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या येव्यामुळे (इन्फ्लो) धरण निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा तेरणा नदीमार्गे सोडावा लागणार आहे.

त्यामुळे तेरणा नदी काठावरील शेतकरी,नदीकाठी वस्ती करुन राहीलेले नागरिक यांनी सतर्क राहावे, जेणेकरुन जिवीत व वित्त हानी होणार नाही, असे लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत