संभाव्य पूराची परिस्थिती विचारात घेता प्राथमिक व माध्यमिक शाळांना 15 व 16 जूलै या दोन दिवशी सुट्टी जाहीर

 

संभाव्य पूराची परिस्थिती विचारात घेता

 

प्राथमिक व माध्यमिक शाळांना 15 व 16 जूलै या दोन दिवशी सुट्टी जाहीर

 

         *लातूर दि.14(जिमाका):-*  प्रादेशिक हवामान मुंबई यांचा इशारा दि. 11 जूलै 2022 नुसार लातूर जिल्ह्यात दि. 14 जूलै 2022 पासून अतिवृष्टीचा धोका असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

       त्यामुळे संभाव्य पूराची परिस्थिती विचारात घेता लातूर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवसापनाच्या प्राथमिक / माध्यमिक  व उच्च माध्यमिक शाळांना दि. 15 जूलै 2022 व 16 जूलै 2022 या दोन दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

         त्यानंतर दि. 18 जूलै 2022 रोजी सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा पुर्ववत चालू रहातील याची नोंद घ्यावी.

     टिप :- आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 लागू असल्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेवर दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे याची नोंद घ्यावी असे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                 0000

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित