मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा

 

मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा

लातूर, (जिमाका) दि. 12 :  - मांजरा, तेरणा व तावरजा नदीवरील बराज, को. प. बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात येवा सुरु असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्जन्यवृष्टी राहून येवा प्रकल्पात येणारा येवा असाच राहीला तर प्रकल्प केंव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर प्रकल्पात येणारा येवा मांजरा, तेरणा व तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार आहे.

मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहीलेले नागरिक यांना सावधानतेचा इशारा लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 लातूरचे कार्यकारी अभियंता रो.सु. जगताप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत