साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे अनुदान व कर्जाकरीता अर्ज करावे

 

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे

अनुदान व कर्जाकरीता अर्ज करावे

 

        *लातूर,दि.29,(जिमाका),:-*साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मातंग समाजातील मांग, मातंग व 12 पोट जातीतील सुशिक्षित बेरोजगार, महिला व पुरुषांनी महामंडळाकडे अनुदान व कर्ज मिळणे करीता अर्ज करावेत.

         सन 2022-23 या आर्थिक वर्षात शासनाकडून उद्दिष्ट अनुदान योजने अंतर्गत 150 व 20 टक्के बीजभांडवल योजने अंतर्गत 50 उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत.जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकाना उद्दिष्ट वितरण जिल्हा अग्रणी बँकेकडून व महामंडळाकडून वितरण झालेले आहे.

         सन 2022-23 मधील सर्व मातंग समाजातील अर्ज केल्यानंतर जेष्ठतेनुसार त्या-त्या दतक बँकेला अर्ज मंजुरी करिता पाठविण्यात येईल बँकेने अर्ज मंजुर केल्यानुसार महामंडळकाडून अनुदान व कर्ज लगेच वितरण करण्यात येईल.

      या करीता पात्र अर्जदारांनी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेट समोर, लातूर येथे अर्ज करावेत व अर्ज विनामुल्य राहील असे जिल्हा व्यवस्थापक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                     000

       

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत