लातूर जिल्ह्यासाठी 2024 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

 लातूर जिल्ह्यासाठी 2024 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर 

लातूर दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यासाठी 2024 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 27 डिसेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेनुसार जाहीर केल्या आहेत. यानुसार 11 जानेवारी 2024 रोजी दर्शवेळा अमावस्या, 11 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरीपूजन आणि 30 डिसेंबर 2024 रोजी दर्शवेळा अमावस्या निमित्त जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहणार आहे.

जिल्ह्यातील उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षातील कार्यालये वगळता लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, जिल्ह्यातील कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना या तिन्ही सुट्ट्या लागू राहतील.

**** 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित