विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जेवणात अळ्या आढळल्याचे वृत्त चुकीचे

                                विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

रुग्णालयातील जेवणात अळ्या आढळल्याचे वृत्त चुकीचे

लातूर दि. 1 (जिमाका) : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जेवणात जिवंत अळ्या आढळल्याचे वृत्तविषयक संकेतस्थळावर प्रसिद्ध आले आहे. हे वृत्त चुकीचे असून असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्टीकरण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी दिले आहे.

जेवणात जिवंत अळ्या आढळल्याबाबतच्या वृत्ताची पडताळणी केली असता, ही घटना इतर जिल्ह्यातील असून लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे डॉ. जोशी यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास