यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल

योजनेसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. 16 (जिमाका):  विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या 24 जानेवारी, 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना सुरु केली आहे.

या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत 31 जानेवारी, 2024 पर्यंत सादर करण्याचे असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत