लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये अशासकीय लिपिक टंकलेखक पदाची होणार भरती

 

लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये

अशासकीय लिपिक टंकलेखक पदाची होणार भरती

लातूर, दि. 17 (जिमाका):  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवरील अशासकीय लिपिक टंकलेखक पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक माजी सैनिकांनी 29 जानेवारी 2024 रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पदासाठी सैन्य सेवेत लिपिक या कामाचा अनुभव, मराठी व इंग्लिश टायपिंग असल्यास प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक माजी सैनिकांनी  आपला अर्ज व सर्व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी 29 जानेवारी 2024 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे स्वतः उपस्थित राहावे. निवड  निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार असल्याचे लातूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत