लातूर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध · 20 जानेवारी रोजी होणार परीक्षा

 लातूर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे

हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध

·       20 जानेवारी रोजी होणार परीक्षा

लातूर, दि. 02 (जिमाका): येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीटऑनलाईन उपलब्ध झाले असून हे हॉल तिकिट डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन विद्यालयाचे  प्राचार्य संजय पाटील यांनी केले आहे. जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी 20 जानेवारी 2024 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे.

जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी ज्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरले आहेत, त्यांनी परीक्षेचे हॉल तिकिट  https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard  या संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन घ्यावेत. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीटावरील सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. नवोदय विदयालय समितिच्या नियमानुसार परीक्षेचे माध्यम व परीक्षा केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. हॉल तिकिट डाऊनलोड करुन घेण्यास काही अडचण असल्यास नवोदय विदयालय लातूरचे परीक्षा प्रभारी बी. डी. शेख (भ्रमणध्वनी क्र. 9817834930) किंवा व्ही. एच. खिल्लारे (भ्रमणध्वनी क्र. 9860568840) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य श्री. पाटील यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत