‘आयईडीएसएसए जी-2 झोन’ महिला मैदानी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

 

 आयईडीएसएसए जी-2 झोन’ महिला मैदानी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

लातूर,29: येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, येथे 29 जानेवारी 2025 रोजी आयईडीएसएसए जी 2 झोन महिला मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, पोलीस निरीक्षक श्रीमती बी.एस.वाकडकर यांची उपस्थिती होती.

 यावेळी डॉ. सलीम शेख यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्यांत आला. मान्यवरांना विविध तंत्रनिकेतनातील महिला संघांनी मानवंदना दिली. क्रीडा स्पर्धेची शपथ विद्यार्थीनी शिवानी वरपे हिने सर्व खेळाडूंना दिली. विद्यार्थीनींनी अभ्यासात रुचीबरोबर खिलाडू वृत्तीही जोपासली पाहीजे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळाचे असलेले महत्व डॉ. सलीम शेख यांनी मार्गदर्शनात नमूद केले. त्यांच्या शालेय जीवनातील खेळासंबधी आठवणी मुलींना सांगून खेळासाठी प्रोत्साहन दिले.

पालीस निरीक्षक श्रीमती बी.एस. वाकडकर यांनी स्पोर्टस इव्हेंट मॅनेजर, स्पोर्टस जर्नलिझम, स्पोर्टस ऑडीटर सारख्या संधी भविष्यकाळामध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. महिलांच्या जीवनातील खेळाचे महत्व त्यांनी नमूद केले.

कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य एस.डी. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मुलींनी खेळामध्ये सांघीक भाव जोपासून स्पर्धा पार पाडाव्यात, असे आवाहन प्राचार्य श्री. राठोड यांनी केले.

सूत्रसंचालन श्रीमती आर.व्ही. कोताळकर यांनी केले, श्रीमती प्रणोती ऐतवाडे यांनी आभार मानले. या दोन दिवसीय स्पर्धेत व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, अॅथलेटीक्स इ. मैदानी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. क्रीडा पंच म्हणून श्री. चाकूरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील श्री. गिरगावकर, श्री.सूर्यवंशी, श्री. जगताप, श्री. सांगवीकर, श्रीमती हरताळकर, श्रीमती गादगीकर, जीएस फिजा शेख, क्रीडा सचिव वेदिका गायकवाड, अतुल पाटील, रवी राठोड, पंकज स्वामी, अरविंद कांबळे यांनी प्रयत्न केले.

****

 

 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित