जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय परिसरात सात कलमी कृती आराखड्यानुसार स्वच्छता मोहीम

  



लातूर, दि. १७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती आराखड्यानुसार आज जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा पशुचिकित्सालय येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग घेतला.

 

या उपक्रमादरम्यान परिसर स्वच्छता, कचऱ्याचे व्यवस्थापन, झाडांची छाटणी, तसेच कार्यस्थळ स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. स्वच्छता मोहिमेचा उद्देश स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे होता. या उपक्रमामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केला आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण होईल आणि प्रत्येकजण आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने पुढे येईल, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत