फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांग बांधवांनी ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी

दिव्यांग बांधवांनी ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि. २७ : हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांग व्यक्तींकडून ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

 दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीला चालना मिळावी. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिकसामाजिक पुनर्वसन व्हावे. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवारकुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे, हा योजनेचा उद्देश आहे.

सन २०२४-२५ साठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याची योजना लागू करण्यासाठी १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. यांच्यास्तरावरुन सुरू आहे. राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराची नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल २२ जानेवारी २०२५ रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित