लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये झाला महिला विषयक योजनांचा जागर !

 लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये झाला महिला विषयक योजनांचा जागर !


* सर्वत्र विशेष महिला सभा उत्साहात

लातूर, दि. २५ : महिलांविषयी विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित विशेष महिला सभा उत्साहात पार पडल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विविध विषयावर महिला सभेत चर्चा करण्यात आली

ग्रामपंचायत महिला व बालकल्याण खर्चाचे नियोजन, लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत सातबारावर सहधारक म्हणून महिलेचे नाव लावणे, विविध विभागांच्या महिला लाभार्थीसाठी असलेल्या योजनांची माहिती, महिला केंद्रीत 'आई' पर्यटन धोरण राबविणे, ग्रामीण भागातील घरांची नोंदणी पती-पत्नी यांच्या संयुक्त नावे करणे, गावातील विधवा अथवा एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे आदी आदी विषयांवर महिला सभेत चर्चा करून ठराव घेण्यात आले. तसेच गावात बालविवाह होऊ नये, यासाठी सभेत शपथ घेण्यात आली.

लातूर तालुक्यातील पाखरसांगवी ग्रामपंचायतीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
****  








Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत