14 व 19 मार्च रोजी मद्यविक्री बंद

 14 व 19 मार्च रोजी मद्यविक्री बंद

लातूर,दि.11,(जिमाका):- जिल्ह्यात धुलीवंदन व रंगपंचमीनिमित्त 14 मार्च, 2025 आणि 19 मार्च, 2025 रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत.

14 मार्च 2025 धुलीवंदननिमित्त सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपुर तालुका व निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, तगरखेडा व शेळगी या गावातील मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच 19 मार्च 2025 रोजी रंगपचंमीनिमित्त लातूर, औसा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, चाकूर व निलंगा (निलंगा तालुकयात औराद शहाजनी, तगरखेडा, शेळगी ही गावे वगळून) मद्यविक्री सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हे आदेश सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती यांना लागू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या अनुज्ञप्तीधारंकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक केशव राऊत यांनी कळविले आहे.

****  

 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित