500 हेक्टरखालील तलाव जाहीर लिलाव बोलीमध्ये मत्स्यव्यवसाय संस्थांनी सहभागी व्हावे

 

500 हेक्टरखालील तलाव जाहीर लिलाव बोलीमध्ये

मत्स्यव्यवसाय संस्थांनी सहभागी व्हावे

लातूर,दि.5: जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील जलक्षेत्रे असलेल्या देवणी तालुक्यातील दवन हिप्परगा आणि अहमदपूर तालुक्यातील हागद गुदगळ हे पाटबंधारे तलाव लातूर जिल्ह्यातील पात्र मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेअंतर्गत (बोली) जाहीर लिलाव पध्दतीने ठेक्याने देण्यात येणार आहेत. यासाठी 12 मार्च, 2025 रोजी दुपारी 3 वाजता सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, लातूर यांच्या दालनात जिल्हास्तरीय तलाव ठेका समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेमध्ये लातूर जिल्ह्यातील पाटबंधारे तलाव ठेक्याने देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. लिलावातील तलावाची न्युनतम ठेका रक्कम, तलाव ठेका सुरक्षा अनामत व वार्षिक इष्टतंम मत्स्यबोटूकली संचयन किंमत 10 टक्के रक्कम तसेच अटी शर्ती व सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, लातूर यांच्या कार्यालयात (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत पाहण्यास मिळतील. तरी पात्र संस्थेने बोली लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, लातूर यांनी केले आहे.

भाग घेणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रांची पुर्तता 11 मार्च, 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, लातूर कार्यालयाकडे करावी लागेल, असे लातूर येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त तेजस्विनी करळे यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत