गांधी चौक पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांबाबत आवाहन

  

गांधी चौक पोलीस स्टेशन येथील

बेवारस वाहनांबाबत आवाहन

 

लातूर,दि.12,(जिमाका):-   शहरातील गांधी चौक पोलीस स्टेशन येथे 50 वाहने बेवारस स्थितीत आहेत. या वाहनांवर ज्या कोणाची मालकी असेल, त्यांनी 15 दिवसांत मालकविषयक कागदपत्रासंह गांधी चौक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गांधी चौक पोलीस स्टेशन येथे असलेली 50 वाहने भारतीय नागरी सुरक्षा संहिता 106 (102 सीआरपीसी) , 124 म.पो.का. प्रमाणरे कार्यवाही करुन ताब्यात घेण्यात आली आहेत. या वाहनांच्या रजिस्टर क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांकची माहिती गांधी चौक पोलीस स्टेशन येथे उपलब्ध आहे. विहीत मुदतीत कोणाचीही मालकी हक्क सिध्द न झाल्यास कोणाचीही तक्रार नाही, असे गृहीत धरुन मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 458 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत