गांधी चौक पोलीस ठाणे आवारातील बेवारस वाहनांबाबत आवाहन

 

गांधी चौक पोलीस ठाणे आवारातील

बेवारस वाहनांबाबत आवाहन

लातूर,दि.5:  गांधी चौक पोलीस ठाणे येथे बेवारस, दोन चाकी वाहने बऱ्याच दिवसापासून पोलीस ठाणे आवारात पाडून आहेत. वाहने वातावरणाचा पारिणाम होवून सडून जात आहेत.

या वाहनाचा प्रकार, रजि. नं., चेसीस नं., यांची खात्री करुन ज्या कोणाचे वाहन असेल, त्यांनी या पोलीस स्टेशला आपला मालकी हक्क सादर करुन ताब्यात घेवून जावेत. मालकी हक्काची सर्व कागदपत्रे दाखवून घेवून जाण्याची मुदत फक्त 15 दिवस राहणार आहे, अन्यथा सर्व वाहने स्क्रॅप, भंगार करुन लिलावाद्वारे विक्री करुन ती रक्कम शासनास जमा करण्यात येणार आहेत, याची सर्व सुजान नागरिकांनी नोंद घ्यावी. दिलेल्या 15 दिवसांच्या मुदतीनंतर कोणी आक्षेप घेतल्यास अथवा दावा केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशन गांधी चौकचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी केले आहेत.

****

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत