महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे ‘माविम’ मार्फत 8 मार्चपासून प्रदर्शन व विक्री

महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे

‘माविम’ मार्फत 8 मार्चपासून प्रदर्शन व विक्री

 

      लातूर,दि.6:  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) लातूर जिल्हा कार्यालयामार्फत ‘माविम’च्या 50 वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त 8 ते 10 मार्च, 2025 या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री - नवतेजस्विनी महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे.  8 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये बचत गटातील महिलांचा सन्मान समारंभ, शासनाच्या विविध योजनांची माहिती, विविध चर्चासत्रे व मार्गदर्शन, महिलांचे आरोग्य व सकस आहार या विषयी मार्गदर्शन, महिला बचत गटांचे स्टॉल, विविध खाद्य पदार्थांची मेजवानी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात बचत गटातील महिलांनी तयार केलेले घरगुती मसाले,  शुद्ध हळद पावडर,  विविध प्रकारचे पापड,  विविध प्रकारचे लोणचे,  शेवया,  सांडगे,  कुरुडी,  लाल व काळे तिखट,  हडोळाती चे प्रसिद्ध काळे तिखट,  घाण्याचे करडी व सूर्यफूल तेल, खोबर तेल, विविध दुग्धजन्य पदार्थ - खवा, पेडा बासुंदी, पनीर व तूप, कडक ज्वारी व बाजरी ची भाकरी,  सोलापुरी शेंगदाना चटणी, लाडू,चिवडा, विविध प्रकारच्या डाळी, जात्यावर तयार केलेल्या डाळी, गहू, मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त पिवळी ज्वारी,  जवसाची चटणी,  तीळ,  दुरडी, झाडू, खराटा, फडा, रुखवताचे सामान, लोकरीचे पडदे, मायक्रॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी,  साड्या, स्कार्प, पडदे, गारमेन्ट,   विणकाम,  कपड्याच्या बॅग,  टिफिन बॅग, सौदर्य प्रसाधणे, परफ्यूम इत्यादीचे तसेच विविध स्टॉल असणार आहेत.

जिल्ह्यातील व लातूर शहरातील नागरीकांनी या प्रदर्शनास भेट देवून ग्रामीण महिलांनी तयार व उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल यांनी केले आहे.      

*****


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत