पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत

शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

लातूरदि. ८ (जिमाका): १२ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवली जात आहे. मृग बहार २०२४ साठी डाळींबचिकूपेरूसिताफळ आणि लिंबू या पाच फळपिकांसाठीतर आंबिया बहार २०२४-२५ साठी डाळींबद्राक्षआंबापपई आणि केळी या पाच फळपिकांसाठी ही योजना लागू आहे.

या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा घेतला आहेपरंतु डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएसमोबाइल ॲपद्वारे ई-पीक पाहणी केलेली नाहीत्यांनी २५ एप्रिल २०२५ पर्यंत ती पूर्ण करावी. अन्यथाशासन निर्णयानुसारसातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द होतील आणि विम्याचा लाभ मिळणार नाही. अधिक माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी कळवले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत