जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे शनिवारी आयोजन

 जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे शनिवारी आयोजन

लातूरदि. ८ (जिमाका): उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी १२ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी रोडवरील हॉटेल ग्रँड सरोवर येथे लातूर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेचा उद्देश जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवणेनवउद्योजकांना आकर्षित करणे आणि गुंतवणूकदार-व्यवसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. लातूर जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू बनवून जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी यामाध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यावेळी नवउद्योजकांसोबत सामंजस्य करार होऊन त्यांना एमआययू वितरित केले जाणार आहेतअसे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे यांनी कळवले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत