महादेववाडी येथे विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरु

 महादेववाडी येथे विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरु

लातूरदि. २२ : औसा तालुक्यातील महादेववाडी येथे पाणी टंचाई निर्माण झाल्याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने महादेववाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी त्वरित विंधन विहीर (बोअर) अधिग्रहीत करण्यात आली असून याद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

महादेववाडी येथे ११० कुटुंब असून सार्वजनिक, शासकीय स्त्रोतांचे पाणी कमी झाल्यामुळे, तसेच काही स्त्रोतांचे पाणी बंद झाल्याने पाणी टंचाई निवारणार्थ खासगी विंधन विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावाला त्वरित मंजुरी देवून पाणी पुरवठा सुरु करण्यात आल्याचे औसाचे तहसीलदार घनश्याम आडसूळ व गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत