लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील 33 बेवारस मोटार सायकलींचा 15 एप्रिलला लिलाव

 लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील

33 बेवारस मोटार सायकलींचा 15 एप्रिलला लिलाव

लातूर, दि. 9 (जिमाका):  लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील बेवारस असलेल्या मोटार सायकलींचा जाहीर लिलाव करण्यास लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी व लातूर तालुका दंडाधिकारी यांच्याकडून परवानगी मिळाली आहे.

लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील बेवारस असलेल्या 33 मोटार सायकलींचा लिलाव मंगळवार, 15 एप्रिल, 2025 रोजी  करण्यात येत आहे.

तरी इच्छूक खरेदीदारांनी 15 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10 वाजता लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 200 रुपये किंमतीच्या बाँडसह उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित