Posts

Showing posts from 2026

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण · मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश · जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात · मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण · मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश · जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात · मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका लातूर, दि. ०६ : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व मतदान पथके आज संबंधित तालुका स्तरावरून रवाना झाली. तसेच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने आवश्यक सज्जता केली आहे. जिल्ह्यात एकूण ५९ जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी २४२ उमेदवार निवडणू...

लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकावून ठेवलेल्या वाहनांचा होणार लिलाव

लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकावून ठेवलेल्या वाहनांचा होणार लिलाव लातूर, दि. ०६ : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोटार वाहन कर जमीन महसूल आदी थकबाकीमुळे अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेची (वाहनांची) विक्री लिलाव प्रक्रियेद्वारे होणार आहे. हा लिलाव १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १२ ते दुपारी ३ वाजेदरम्यान ऑनलाइन पद्धतीने पार पडेल. लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन धारकांना थकबाकी भरण्याची संधी दिल्यानंतरही वाहने सोडविली न गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी, लिलावाच्या अटी व शर्ती तसेच इतर तपशील https://www.eauction.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे मद्यविक्री राहणार बंद

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे मद्यविक्री राहणार बंद लातूर, दि. 06 : लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १० पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक २०२६ कार्यक्रमानुसार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान व ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मतदानापूर्वीचा संपूर्ण दिवस म्हणजे ६ फेब्रुवारी २०२६, मतदानाचा संपूर्ण दिवस म्हणजे ७ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्र वगळून संपूर्ण लातूर जिल्हा अबकारी अनुज्ञप्त्या (मद्य दुकाने) बंद राहतील. याशिवाय, मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, लातूर जिल्ह्यातील मतमोजणीचे ठिकाणी मद्यविक्री अनुज्ञप्त्याही बंद राहतील. एफएल-२, एफएलबीआर-२, एफएल-३, एफएल-४, एफएलबीआर-११ तसेच ताडी अनुज्ञप्ती इत्यादी सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९ व म...

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. 6 : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता बारावी) 10 फेब्रुवारी, 2026 ते 11 मार्च, 2026 या कालावधीत 152 परीक्षा केंद्रावर व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) 20 फेब्रुवारी, 2026 ते दि. 18 मार्च, 2026 या कालावधीत 252 परीक्षा केंद्रावर पार पाडली जाणार आहे. या सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये या परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्या...

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना लातूर, दि. 05 (जिमाका): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन 2023-24 पासून लातूर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. यात मुलांसाठी 100 आणि मुलींसाठी 100 अशा एकूण 200 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांचा समावेश आहे. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाते. या वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी त्या शहराचा स्थानिक रहिवाशी नसावा, जिथे शैक्षणिक सं...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे उघडणार ! आदिवासी विकास विभागाकडून पात्र 40 तरुण-तरुणींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे उघडणार ! आदिवासी विकास विभागाकडून पात्र 40 तरुण-तरुणींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार लातूर दि. ०५ (जिमाका) : अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलां-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी, त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. या योजनेतंर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 40 गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण व परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक, आकस्मिक, इतर खर्च, विमान प्रवास खर्च,व्हिसा शुलक आणि आरोग्य विमा यांचा समावेश असणार आहे. शैक्षणिक, आकस्म...

सावित्रीबाई फुले आधार आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

सावित्रीबाई फुले आधार आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 05 (जिमाका): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या, परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 साठी सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 600 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. महसुली विभाग शहर आणि क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी 43 हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना 38 हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आणि वसतिगृह प्रवेशास पात्र असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असून पाल...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनिमित्त लातूर जिल्ह्यात शनिवारी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनिमित्त लातूर जिल्ह्यात शनिवारी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद लातूर, दि. 5 : लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 10 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, 07 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदान शांततेत पार पडावे, यासाठी लातूर जिल्ह्यात शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. त्यानुसार लातूर तालुक्यातील कन्हेरी, औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ, अशिव व किल्लारी, रेणापूर तालुक्यातील पानगाव, निलंगा तालुक्यातील आंबुलगा बु., चाकूर तालुक्यातील वडवळ ना. आणि जळकोट तालुक्यातील घोणसी येथे शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 भरणारा आठवडी बाजार बंद राहणार असून, या दिवशीचा आठवडी बाजार इतर दिवशी भरविण्यात येणार आहे. मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1982 चे कलम 5 (अ) मधील तरतुदीनुसार पणन संचालक यांनी दिलेल्या मान्यतेनुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ****

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठी लातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठी लातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा लातूर, दि. ४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक (इयत्ता बारावी) प्रमाणपत्र परीक्षा भयमुक्त व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी लातूर विभागीय मंडळाने विशेष व्यवस्था केल्या आहेत. यासाठी विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या असून तसेच समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हेल्पलाईन क्रमांक (सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत उपलब्ध) वरिष्ठ अधिक्षक तथा (प्र) सहाय्यक सचिव श्री. चवरे ए. पी. (मो. ९४२१७६५६८३) इयत्ता बारावीसाठी (उच्च माध्यमिक): ०२३८२-२५१६३३ सहाय्यक अधिक्षक तथा (प्र) व.अ. श्री. कारसेकर जे. एस. (मो. ९८२२८२३७८०) पर्यवेक्षक लिपीक श्री. पवार एन. पी. (मो. ९८३४४६४१७७) वरिष्ठ लिपीक श्री. राठोड ए. सी. पी. (मो. ९५४५२४२७२६) इयत्ता दहावीसाठी (माध्यमिक): ०२३८२-२५१७३३ सहाय्यक अधिक्षक तथा (प्र) व.अ. श्री. केंद्रे एम. व्ही. (मो. ९४...

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर ,   दि.   03   ( जिमाका) :    कायदा व सुव्यवस्था ,   सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके    यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम   1951   च्या कलम   37 (1)   व ( 3)    नुसार    संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी   आदेश   जारी केले आहेत. हा   आदेश   संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत   04   फेब्रुवारी , 202 6   रोजीच्या   00.01   वाजेपासून ते   18 फेब्रुवारी , 202 6   रोजीच्या   24.00   वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन)   लागू   राहील.   शस्त्रबंदी व जमावबंदी    काळात या   आदेशान्वये शस्त्रे ,   सोटे ,   तलवारी ,   भाले ,   दंडे ,   बंदुका ,   सुरे ,   काठ्या ,   लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी    वापरता येईल ,   अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्...

बालविवाह मुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची सामूहिक शपथ; ‘आशा’ मोहिमेअंतर्गत संत नामदेव विद्यालयात जनजागृती कार्यक्रम

Image
बालविवाह मुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची सामूहिक शपथ; ‘आशा’ मोहिमेअंतर्गत संत नामदेव विद्यालयात जनजागृती कार्यक्रम लातूर, दि. ०३ : बालविवाह मुक्त भारत अभियान आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या अंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या ‘आशा’ मोहिमेअंतर्गत लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर येथील संत नामदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. बाल विवाहाचे दुष्परिणाम, बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६, बाल संरक्षणाशी संबंधित विविध कायदे याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी विद्यार्थ्यांना बाल विवाहास कठोर विरोध करण्याचे आवाहन केले. तसेच बाल विवाहामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होतो. विवाहासाठी मुलीचे किमान वय ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळेलातूर शहरातील मद्यविक्री राहणार बंद

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळेलातूर शहरातील मद्यविक्री राहणार बंद लातूर, दि. ०२ : लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १० पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक २०२६ कार्यक्रमानुसार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान व ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मतदानापूर्वीचा संपूर्ण दिवस म्हणजे ६ फेब्रुवारी २०२६, मतदानाचा संपूर्ण दिवस ७ फेब्रुवारी २०२६ रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या (मद्य दुकाने) बंद राहतील.याशिवाय, मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणच्या परिसरातील मद्यविक्री अनुज्ञप्त्याही बंद राहतील. एफएल-२, एफएलबीआर-२, एफएल-३, एफएल-४, एफएलबीआर-११ तसेच ताडी अनुज्ञप्ती इत्यादी सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९ व महाराष्ट्र विदेशी मद्य नियम, १९६९ मधील तरतुदीनुसार निर्...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने राबवायचा मतदार यादी कार्यक्रम घोषित

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने राबवायचा मतदार यादी कार्यक्रम घोषित लातूर, दि. 02 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाच्या 29 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशानुसार पारंपारीक पद्धतीने राबविण्याचा मतदार यादी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदत संपलेल्या, तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्‍त झालेल्‍या जागांच्‍या पोटनिवडणुकांसाठी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यासाठी 01 जुलै 2026 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी सोमवार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. 24 फेब्रुवारी 2026 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. ****

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा लातूर दि. ३१ : जिल्ह्यातील १५२ परीक्षा केंद्रांवर इयत्ता दहावीची आणि १०० परीक्षा केंद्रांवर इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होत आहे. या परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वतयारी सुरु आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नुकताच या पूर्वतयारीचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या. शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातून ३९ हजार २४२ विद्यार्थी इयत्ता दहावी, तर ३६ हजार ५११ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत. प्रत्येक परीक्षा कक्षात, परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा देत असतांना विद्यार्थ्यांनी काय करावे, काय करू नये, याबाबतच्या सूचना प्रत्येक परीक्षा केंद्राच्या सूचनाफलकावर लावण्यात येणार आहेत. राज्य मंडळामार्फत तयार कर...

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा · १८ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. ३१ : अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल शाळांमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून या परीक्षेचे अर्ज भरून मुख्याध्यापकांनी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे १८ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत सादर करावेत, असे छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी कळविले आहे. परीक्षेचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. अमरावती आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त एकात्म‍िक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद आणि कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या १२ जिल्ह्यांतील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व म...

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द लातूर, दि. २९ : रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खत आणि कीटकनाशकांचा पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. पुणे येथील संचालक (नियंत्रण व गुणनियंत्रण) कृषी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यात भरारी पथक आणि कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांनी कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान काही केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ८ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत एकूण १७ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. या मध्ये बियाणे विक्रीचे १३, खत विक्रीचे २ आणि कीटकनाशक विक्रीचे २ परवाने रद्द झाले आहेत.तसेच ८ कृषी निविष्ठा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. साठाफलक व भावफलक प्रदर्शित न करणे, साठा नोंदवही आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत, भावफलक, साठा नोंद अद्ययावत न ठेवणे, विक्री बिलावर शेतकऱ्यांची सही/अंगठा न घेणे, बियाण्यांचा संपूर्ण तपशील बिलात न लिहिणे, उत्पादकाचा स्त्रोत न दर्शविणे, ई-पॉस...

फेब्रुवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित

फेब्रुवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित लातूर, दि. २९ : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु, सद्यस्थितीत लातूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजवणी सुरु असल्यामुळे ०२ फेब्रुवारी २०२६ रोजीचा लोकशाही दिन स्थगित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन · घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी मध्यम प्रकल्पाचा समावेश लातूर, दि. २९ : लातूर पाटबंधारे विभाग क्रं. २ विभाग अंतर्गत घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी मध्यम प्रकल्प, तसेच ९८ लघु प्रकल्प, साठवण तलाव व बॅरेजस आदी प्रकल्पातील पिण्यासाठी आवश्यक आरक्षित पाणीसाठा वगळता उर्वरित पाणी रब्बी हंगामात सिंचनासाठी देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित पाटबंधारे विभागाच्या शाखा अधिकारी कार्यालयात पाणी मागणी अर्ज सादर करावेत, असे लातूर पाटबंधारे विभाग क्र. २ चे उपकार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ करिता सर्व सिंचन लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना ७ व ७ अ शासनाने सुधारित केलेल्या नमुन्यात संबंधित शाखा अधिकारी यांचे कार्यालयात पाणी अर्ज भरून शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सादर करावेत. तसेच कमी पाण्यात येणारी रब्बी हंगामी पिके प्राधान्याने घ्यावीत. प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा विचार करता, प्रवाही सिंच...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 26 जानेवारी रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 26 जानेवारी रोजी बंद राहणार लातूर, दि. 24 (जिमाका) : प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सोमवार, 26 जानेवारी 2026 रोजी बंद राहील. तसेच मंगळवार, 27 जानेवारी 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. *

प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन

प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन लातूर, दि. 23 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार, 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. या कार्यक्रमास नागरिकांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता, यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा सकाळी 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. ***

लातूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार ऐतिहासिक कवायत सादरीकरण ▪️सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित कवायत संचलन

लातूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार ऐतिहासिक कवायत सादरीकरण ▪️सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित कवायत संचलन लातूर, दि. २३ : जिल्ह्यात २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित भव्य कवायत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी जिल्हास्तरीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे एकत्रित कवायत संचलन सादर केले जाणार आहे. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमास पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी प्राथमिक तृप्ती अंधारे तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील इतर नऊ तालुक्यांमध्ये देखील ध्वजवंदनानंतर स्वतंत्रपणे कवायत आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधून विद्या...

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ लातूर, दि. २३ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार २५ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांनी मतदार जागृतीची शपथ घेतली. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, तहसीलदार संतोष बनकर, नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. वयाची अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर मतदार नोंदणी करणे आणि मतदान करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. या वर्षी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाने 'माझा भारत, माझे मत' ही थीम आणि 'भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक' ही टॅगलाइन जाहीर केली आहे. या थीमच्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवावेत, तसेच प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा. लातूर जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या राष्ट्रीय उत्सवात सक्र...

लातूर जिल्हास्तरीय गायन स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनी गीतांमधून मांडला श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जीवनपट

Image
लातूर जिल्हास्तरीय गायन स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनी गीतांमधून मांडला श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जीवनपट लातूर, दि. २२ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ज्ञानप्रकाश शिक्षण संकुलात ‘हिंद दी चादर’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्साहाने भाग घेत विद्यार्थ्यांनी गीतांमधून श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनातील त्याग, बलिदान आणि शौर्य यांची प्रभावी मांडणी केली. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाते, त्यांनी मानवता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणास लावले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आदर्शांचा आणि त्यांच्या अमर बलिदानाचा संदेश पोहचला. स्पर्धेत सादर केलेल्या गीतांमधून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जीवनपट उलगडला गेला. समग्र शिक्षा अभियानचे चंद्रकांत ठाकरे यांनी या स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पहिले. तसेच संगीत शिक्षक विश्वजीत पांचाळ आणि शाहीर श्रीमती अॅड. अपेक्षा डाके यांनी पर...

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 22 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ ग्रंथभेट’ योजनेतंर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येणार येतात. या योजनेतंर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रथांची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय स्तरावरुन प्रसिध्द होणाऱ्या ‘ शासनमान्य ग्रंथ निवड यादी’ मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2025 कॅलेंडर वर्षात दि. 1 जानेवारी, 2025 ते दि. 31 डिसेंबर, 2025 प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामुल्य प्रत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे २८ फेब्रुवारी, 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. २८ फेब्रुवारी, 2026 नंतर प्राप्त झालेलया ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेसाठी सन 2025 या वर्षात प्रकाशि...

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : प्रधान सचिव श्रीकर परदेशी

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : प्रधान सचिव श्रीकर परदेशी  सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा घेतला आढावा  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक नांदेड, दि. 21 जानेवारी:- नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम होत आहे. जागतिक स्तरावरील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. सर्व भाविकांची व्यवस्था चोख होईल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या तयारीचा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल क...

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अनमोल कार्याची ही माहिती... ​महान योद्धा, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आणि मातृभूमीचे प्रेमी नववे शीख गुरू श्री गुरु तेग बहादूरजी यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची मानवता सदैव ऋणी राहील. त्यांनी विश्वबंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला. धर्म, मातृभूमी आणि लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी जाती-धर्माचा विचार न करता सर्वस्वाचा त्याग केला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या दुर्मिळ सन्मानाने गौरवण्यात आले. आपण श्री गुरु तेग बहादूरजींचा ३५० वा शहिदी समागम वर्ष साजरा करत असताना, धार्मिक स्वातंत्र्याचे महत्त्व आणि मानवजातीच्या व मातृभूमीच्या कल्याणाविषयी शिकवण देणाऱ्य...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम; लातूर जिल्ह्यातील भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन · लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Image
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम; लातूर जिल्ह्यातील भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन · लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा · कार्यक्रमाविषयी जनजागृतीसाठी गावोगावी प्रभात फेरीचे आयोजन लातूर, दि. २१ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने जाणार असून या अनुषंगाने जिल्ह्यात होत असलेल्या जनजागृती उपक्रमांचा व पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज आढावा घेतला. तसेच पुढील दोन दिवस जिल्ह्यात व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, उ...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम पथनाट्यातून मांडली श्री गुरु तेग बहादूरजींच्या अमर बलिदानाची गाथा

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम पथनाट्यातून मांडली श्री गुरु तेग बहादूरजींच्या अमर बलिदानाची गाथा · लातूर जिल्हास्तरीय शालेय पथनाट्य स्पर्धेत ३४ विद्यार्थ्यांचा सहभाग लातूर, दि. २१ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ‘हिंद दी चादर’ पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून श्री गुरु तेग बहादूरजी यांची जीवनगाथा उभी केली. हा उपक्रम श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अमर बलिदानाची आठवण करून देणारा आणि धार्मिक सहिष्णुता, मानवतावाद व धैर्याचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा ठरला. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील ३४ विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. यामध्ये अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय, औसा तालुक्यातील सेलू येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, भादा येथील जिल्हा परिषद प्रशाला, लामजना येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा यासह इतर शाळात...

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- सामाजिक एकोपा, धर्म रक्षणासाठी शहादत देणाऱ्या गुरु तेग बहादुरांना हिंद दी चादर अशी पदवी आहे. त्यांचे जीवन हे समाजाच्या रक्षणासाठी वाहिले. तत्कालीन शास्त्यांकडून समाजावर होत असलेल्या अन्यायपूर्ण वागणुकीचा सामोपचार ज्या पत्राने झाला ते पत्र ‘जफरनामा’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. हाच जफरनामा तत्कालिन मुगल बादशाह औरंगजेब यांच्याकडे देण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहरात आणला गेला होता. आजही त्याची हस्तलिखित प्रत येथील भाई दयासिंग, भाई हरिसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित आहे. एक प्रकारे मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेला हा जफर नामा म्हणजे गुरु तेग बहादुर साहेब यांचे सुपूत्र गुरु गोविंद सिंग यांनी मुगल बादशाह औरंगजेबाला लिहिलेले एक पत्र होय. नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. देश विदेशातील...
Image
‘स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला! गाणं, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती सध्याच्या 'फास्ट फूड', 'इन्स्टा रिल्स'च्या युगात एखादा ट्रेंड किती काळ टिकतो ? फार तर २४ तास! पण, याच डिजिटल जगात ४०० वर्षे जुन्या इतिहासाने आजच्या 'जनरेशन झी'ला (Gen Z) चक्क थांबायला भाग पाडले. निमित्त, सुप्रसिद्ध सुफी गायक डॉ. सतींदर सरताज यांच्या आवाजातील 'हिंद की चादर' या कलाकृतीचे. नांदेडच्या पवित्र मातीत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा ३५० व्या भव्य शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समितीच्या सहकार्याने र्निवैर निर्मित 'हिंद की चादर' डॉक्युमेंटरी (माहितीपट), अन् सरताज यांचे गीत आता केवळ व्हायरल कंटेंट उरला नसून, ती एक 'संस्कारांची डिजिटल चळवळ' बनली आहे. सुरांचा जादूगर : कोण आहेत सतींदर सरताज ? या चळवळीचा चेहरा आणि आवाज आहेत, डॉ. सतींदर सरताज. मूळचे पंजाबचे. सरताज केवळ गायक नाहीत, तर सुफी संगीतातील 'डॉक्टरेट' (Ph.D) आहेत. त्यांच्या गळ्यातून ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर, दि. २१ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. ही निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम

Image
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम लातूर येथे आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लातूर, दि. २० : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत शालेय चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड रोडवरील यशवंत विद्यालयात आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अब्दुल शेख, यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव या उपस्थित होत्या, तसेच स्पर्धेचे समन्वयक म्हणून चित्रकार शिवाजी हांडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी नियमांविषयी माहिती दिली. लातूर जिल्ह्यातील सर्व 10 तालुकास्तरीय स्पर्धांमधून निवड झालेले 30 यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षक म्हणून चंद्रशेखर भालेराव व तेजस शेरखाने यांनी काम पहिले. स्पर्धक विद्यार्थ्यांनी यावेळी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित विविध चित्रे रेखाटली. **

लातूर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागविला गौरवशाली इतिहास

Image
 ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम लातूर, दि. २० :  ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही जिल्हास्तरीय स्पर्धा आज लातूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास जागविला. तसेच त्यांच्या मानवतावादी कार्याचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार आणि शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती व शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर, स्पर्धेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सौताडेकर, परीक्षक डॉ. मकरंद गिरी, दत्ता ओव्हाळ आणि डॉ. उमाकांत चलवदे उपस्थित होते. ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम लातूर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागविला गौरवशाली इतिहास

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम लातूर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागविला गौरवशाली इतिहास लातूर, दि. २० :  ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही जिल्हास्तरीय स्पर्धा आज लातूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास जागविला. तसेच त्यांच्या मानवतावादी कार्याचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार आणि शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती व शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर, स्पर्धेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सौताडेकर, परीक्षक डॉ. मकरंद गिरी, दत्ता ओ...

शुर योध्दा राय लखिशा बंजारा…!

शुर योध्दा राय लखिशा बंजारा…! राय लखिशा बंजारा हे मध्ययुगीन भारतातील शूर, दानशूर आणि लोककल्याणासाठी समर्पित असे महान योद्धा होते. त्यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचा प्रवास हा पराक्रम, त्याग आणि मानवतेचा आदर्श ठरतो. आपले राष्ट्रपती भवन पूर्वाश्रमीचे लखिशा बंजारा यांची ही भूमी आहे. पंजाब मधील खैरपूर तालुका-अलीपूर जिल्हा-मुजफ्फरगड येथे ४ जुलै १५८० रोजी त्यांचा जन्म झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तान मध्ये आहे. वडील गोधु बंजारा वडतिया जाधव व्यवसायाने सिव्हील ठेकेदार होते. आजोबा ठाकूरदास बंजारा वडतिया जाधव योद्धा व कुशल व्यापारी होते. नागैया, हेमा, हरी,सितु,पांडरा,बक्षी, बाला, जवाहर ही मुले तर सितो नावाची मुलगी लखिशा बंजारा यांना होती. १७ नातू व २४ पणतू असा मोठा परिवार होता. १६०८ मध्ये गोराम पवार परिवारातील कांतोबाईसोबत विवाह झाला. लखिशा बंजारा यांना ९९ वर्षे १० महिने एवढे आयुष्य लाभले. नवी दिल्ली येथे रायसिना, मालचा, बाराखांब आणि नरेला ही गावे त्यांनी वसविली आहेत व ८० तांड्याची मालकी होती. राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली चार गावांची १२३३ एकर जमीन लखिशा बंजारा यांच्या नावाने...