प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन

प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन लातूर, दि. 23 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार, 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. या कार्यक्रमास नागरिकांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता, यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा सकाळी 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत