ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने राबवायचा मतदार यादी कार्यक्रम घोषित

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने राबवायचा मतदार यादी कार्यक्रम घोषित लातूर, दि. 02 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाच्या 29 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशानुसार पारंपारीक पद्धतीने राबविण्याचा मतदार यादी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदत संपलेल्या, तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्‍त झालेल्‍या जागांच्‍या पोटनिवडणुकांसाठी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यासाठी 01 जुलै 2026 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी सोमवार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. 24 फेब्रुवारी 2026 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत