जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनिमित्त लातूर जिल्ह्यात शनिवारी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनिमित्त लातूर जिल्ह्यात शनिवारी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद लातूर, दि. 5 : लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 10 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, 07 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदान शांततेत पार पडावे, यासाठी लातूर जिल्ह्यात शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. त्यानुसार लातूर तालुक्यातील कन्हेरी, औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ, अशिव व किल्लारी, रेणापूर तालुक्यातील पानगाव, निलंगा तालुक्यातील आंबुलगा बु., चाकूर तालुक्यातील वडवळ ना. आणि जळकोट तालुक्यातील घोणसी येथे शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 भरणारा आठवडी बाजार बंद राहणार असून, या दिवशीचा आठवडी बाजार इतर दिवशी भरविण्यात येणार आहे. मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1982 चे कलम 5 (अ) मधील तरतुदीनुसार पणन संचालक यांनी दिलेल्या मान्यतेनुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित