लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकावून ठेवलेल्या वाहनांचा होणार लिलाव

लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकावून ठेवलेल्या वाहनांचा होणार लिलाव लातूर, दि. ०६ : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोटार वाहन कर जमीन महसूल आदी थकबाकीमुळे अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेची (वाहनांची) विक्री लिलाव प्रक्रियेद्वारे होणार आहे. हा लिलाव १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १२ ते दुपारी ३ वाजेदरम्यान ऑनलाइन पद्धतीने पार पडेल. लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन धारकांना थकबाकी भरण्याची संधी दिल्यानंतरही वाहने सोडविली न गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी, लिलावाच्या अटी व शर्ती तसेच इतर तपशील https://www.eauction.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित