जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे मद्यविक्री राहणार बंद
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे मद्यविक्री राहणार बंद
लातूर, दि. 06 : लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १० पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक २०२६ कार्यक्रमानुसार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान व ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मतदानापूर्वीचा संपूर्ण दिवस म्हणजे ६ फेब्रुवारी २०२६, मतदानाचा संपूर्ण दिवस म्हणजे ७ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्र वगळून संपूर्ण लातूर जिल्हा अबकारी अनुज्ञप्त्या (मद्य दुकाने) बंद राहतील.
याशिवाय, मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, लातूर जिल्ह्यातील मतमोजणीचे ठिकाणी मद्यविक्री अनुज्ञप्त्याही बंद राहतील. एफएल-२, एफएलबीआर-२, एफएल-३, एफएल-४, एफएलबीआर-११ तसेच ताडी अनुज्ञप्ती इत्यादी सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९ व महाराष्ट्र विदेशी मद्य नियम, १९६९ मधील तरतुदीनुसार निर्गमित केले आहेत. याबाबतची कार्यवाही संबंधित यंत्रणांना निर्देशित करण्यात आली आहे.
***
Comments
Post a Comment