एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा · १८ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. ३१ : अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल शाळांमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून या परीक्षेचे अर्ज भरून मुख्याध्यापकांनी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे १८ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत सादर करावेत, असे छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी कळविले आहे. परीक्षेचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. अमरावती आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त एकात्म‍िक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद आणि कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या १२ जिल्ह्यांतील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व शासन मान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये शिकत असलेले अनुसुचित, आदिम जमातीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र राहतील, असे श्रीमती मोरे यांनी कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित