‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम लातूर येथे आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर, दि. २० : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत शालेय चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड रोडवरील यशवंत विद्यालयात आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अब्दुल शेख, यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव या उपस्थित होत्या, तसेच स्पर्धेचे समन्वयक म्हणून चित्रकार शिवाजी हांडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी नियमांविषयी माहिती दिली. लातूर जिल्ह्यातील सर्व 10 तालुकास्तरीय स्पर्धांमधून निवड झालेले 30 यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षक म्हणून चंद्रशेखर भालेराव व तेजस शेरखाने यांनी काम पहिले. स्पर्धक विद्यार्थ्यांनी यावेळी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित विविध चित्रे रेखाटली. **

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास