राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 22 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ ग्रंथभेट’ योजनेतंर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येणार येतात. या योजनेतंर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रथांची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय स्तरावरुन प्रसिध्द होणाऱ्या ‘ शासनमान्य ग्रंथ निवड यादी’ मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2025 कॅलेंडर वर्षात दि. 1 जानेवारी, 2025 ते दि. 31 डिसेंबर, 2025 प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामुल्य प्रत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे २८ फेब्रुवारी, 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. २८ फेब्रुवारी, 2026 नंतर प्राप्त झालेलया ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेसाठी सन 2025 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. तसेच मुद्रण व नोंदणी अधिनियम, 1867 अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, 1954 अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई , शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. सदर ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधीत ग्रंथालयांकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठवितांना वरीलप्रमाणे ग्रंथ पाठविल्याची पोच पावती ग्रंथासोबत टपालामार्फत वा समक्ष पाठविण्यात यावी. सर्व लेखक, प्रकाशक यांनी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित