राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
लातूर, दि. २३ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार २५ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांनी मतदार जागृतीची शपथ घेतली.
अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, तहसीलदार संतोष बनकर, नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
वयाची अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर मतदार नोंदणी करणे आणि मतदान करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. या वर्षी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाने 'माझा भारत, माझे मत' ही थीम आणि 'भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक' ही टॅगलाइन जाहीर केली आहे. या थीमच्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवावेत, तसेच प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा. लातूर जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या राष्ट्रीय उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.
***
Comments
Post a Comment