इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. 6 : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता बारावी) 10 फेब्रुवारी, 2026 ते 11 मार्च, 2026 या कालावधीत 152 परीक्षा केंद्रावर व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) 20 फेब्रुवारी, 2026 ते दि. 18 मार्च, 2026 या कालावधीत 252 परीक्षा केंद्रावर पार पाडली जाणार आहे. या सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये या परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही व्यक्तीस अथवा वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्याबाबत त्यांच्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. 10 फेब्रुवारी,2026 ते 18 मार्च,2026 या कालावधीमध्ये सकाळी 9 ते दुपारी 6 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित