लातूर येथे 14 फेब्रुवारी रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 लातूर येथे 14 फेब्रुवारी रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूरदि. 11 : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटरआणि स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लातूर येथील पीव्हीआर टॉकीजजवळ कळंब रोडवरील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, हा रोजगार मेळावा होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात 14 पेक्षा जास्त आस्थापनाउद्योजक यांनी 385 रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. यामध्ये लातूर येथील वैभव इंडस्ट्री यांनी अकाउटंटकॅशिअरपरचेसरडाटा एन्ट्री ऑपरेटर,  ड्राफ्टमनइलेक्ट्रिशियनची 15 पदे अधिसूचित केली असून यासाठी कोणतीही पदवी संबंधित आय.टी.आय.डिप्लोमा अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. लातूर येथील राजयोग टोयोटामध्ये सेल्समन, सर्व्हिस ॲडवाझरटेक्निशियनकॅशिअरच्या 25 जागा भरण्यात येणार असून यासाठी बी.ई.डिप्लोमाआय.टी.आय. अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. लातूर येथील सुर्योदय स्मॉल फायनांन्स बँकमध्ये रिलेशनशिप ऑफिसरकलेक्शन ऑफिसरच्या 25 जागांसाठी इयत्ता बारावीकोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

लातूर येथील इंडोमोबिल सेल्स ॲन्ड सर्व्हिस महिंद्रा शोरूम येथे सेल्समन ॲन्ड सर्व्हिसच्या 10 जागा भरल्या जाणार असून कोणतीही पदवी प्राप्त उमेदवार यासाठी पात्र आहेत. लातूर येथील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एलआयसी ऍडवायझरच्या 15 जागांसाठी इयत्ता दहावीबारावीकोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. लातूर येतील पार्थ टेक्नोलॉजीमध्ये  सर्व्हिस इंजि.कॉम्प्युटर ऑपरेटच्या  05 जागा रिक्त आहेत. तसेच सिटको इंजिनिअर्स प्रा. लि. मध्ये टर्नर 05 जागा रिक्त असून यासाठी संबंधित ट्रेडडिप्लोमा अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. नांदेड येथील आयटीएम स्कील्स अकॅडमीमध्ये (आयसीआयसीआय बँक) रिलेशनशिप मॅनेजरच्या 30 जागांसाठी इयत्ता दहावीबारावी,कोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

लातूर येथील क्रेडिट ॲक्सीस ग्रामिण लि.मध्ये रिलेशनशिप ऑफिसरच्या 15 जागा भरल्या जाणार असून यासाठी कोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. लातूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ इन्शुरन्समध्ये फायनान्शियल ॲडव्हायझरच्या 25 जागा भरल्या जाणार असून इयत्ता बारावीकोणतीही पदवीधारक व्यक्ती यासाठी पात्र ठरणार आहे.

पुणे तिरूमला फॅसिलिटीमध्ये ट्रेनीच्या 60 जागा रिक्त असून सर्व ट्रेडचे आयटीआयधारक उमेदवार पात्र आहेत. जहिराबाद येथील जीआयएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ट्रेनीऑपरेटरच्या 75 जागा भरण्यात येणार असून यासाठी आयटीआय सर्व ट्रेडडिप्लोमाधारक उमेदवार पात्र राहतील. सोलापूर येथील सनसुर सृष्टी इंडिया प्रा. लि.मध्ये असिटंट मॅनेजरब्रांच मॅनेजरबिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरच्या 30 जागा भरण्यात येणार असून यासाठी इयत्ता बारावीकोणतीही पदवी प्राप्त उमेदवार पात्र राहतील. छत्रपती संभाजीनगर येथील निपुण स्किल्सनिपुण मल्टीसर्व्हिसेसमध्ये ट्रेनीच्या 50 जागा भरण्यात येणार असून यासाठी आयटीआय सर्व ट्रेडडिप्लोमा, इयत्ता दहावीबारावीकोणतीही पदवीधारक उमेदवार पात्र राहतील.

तरी इच्छूक उमेदवारांनी 14 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10 वाजता लातूर शहरातील पीव्हीआर टॉकीज जवळील कळंब रोडवरील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रेस्वत: चा रिझ्युमबायोडाटापासपोर्ट फोटो (पाच प्रती) आणावेत. या संधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावाअसे अवाहन  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रलातूर या कार्यालयाच्या 02382- 299462 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन