राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानातंर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांसाठी सात दिवसांचे प्रशिक्षण; 25 मार्चपर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत

 

राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानातंर्गत

अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांसाठी

सात दिवसांचे प्रशिक्षण; 25 मार्चपर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत 

 

            लातूर दि. 13:  जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील 25 शेतकऱ्यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान 2024-25 अंतर्गत मांजरा कृषि विज्ञान केंद्र येथे कृषी विभागाच्यावतीने मधुमक्षिका पालन प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी 5 मार्च, 2025 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत.  इच्छुक लाभार्थ्यांचे वय 18 ते 65 वयोगटातील असावे.

            या प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यास इच्छूक शेतकरी अनुसूचित जातीअनुसूचित जमाती आणि महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. हे प्रशिक्षण निवासी स्वरूपाचे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 7 दिवसांचा राहील. प्रशिक्षणाकरीता शेतकऱ्यांनी मार्च 2025 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सातबारा, आठअ, आधारकार्ड, मोबाईल नंबरसहित अर्ज सादर करावा, असे आव्हान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी. जाधव यांनी केले आहे.

****

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन