लातूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी, ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी, ‘ॲग्रीस्टॅक’
नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर, दि. 25
(जिमाका) : लातूर तालुक्यातील ई-पीक पाहणीचे प्रलंबित कामकाज
हे संबंधित गावचे तलाठी यांचे सहाय्यकामार्फत करण्यात येत आहेत. या ई-पीक पाहणीची शेवटची
तारीख 28 फेब्रुवारी, 2025 आहे. तरी लातूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहाय्यकाद्वारे
लवकरात लवकर ई-पीक पाहणी करुन घ्यावी.
तसेच ॲग्रीस्टॅकअंतर्गत
शेतकरी ओळख क्रमांक नोंदणी, नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे सुरु आहे. प्रत्येक
शेतकऱ्यास ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) काढणे बंधनकारक आहे. लातूर
तालुक्यातील शेतकरी संख्या 97 हजार 662 एवढी आहे. त्यापैकी आजपर्यंत 23 हजार 327 एवढ्याच
शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी केली आहे. ॲग्रीस्टॅक हे यापुढील काळात शेतकऱ्यांना
पी.एम. किसान योजना, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती अनुदान, पीक कर्ज, मुलाच्या शैक्षणिक
शिष्यवृत्ती, मुलाच्या शैक्षणिक प्रवेशाकरिता लागणारे शेतकरी कुटूंबांतील दर्शविणारा
पुरावा व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.
शेतकरी ओळख क्रमांक
काढण्यासाठी आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक तसेच शेतीचा गट नंबर माहित असे आवश्यक आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, महाईसेवा
केंद्र, महाईसेवा केंद्र येथे संपर्क करुन आपली नोंदणी करुन घ्यावी, असे लातूर तहसीलदार
सौदागर तांदळे यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment