सीएससी चालविण्यास इच्छूक माजी सैनिकाने नोंदणी करण्याचे आवाहन

 

सीएससी चालविण्यास इच्छूक माजी सैनिकाने नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर,दि.3:   राज्य सैनिक बोर्ड तथा जिल्हा सैनिक बोर्ड या ठिकाणी माजी सैनिकांना स्पर्श प्रणालीतील (स्पर्श पोर्टल) मध्ये असलेल्या अडीअडचणीसाठी सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) स्थापन करण्याबाबत कळविले आहे. तसेच सीएससी चालविण्यासाठी इच्छूक असलेल्या माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित ज्यांना संगणकाचा अनुभव असलेल्यांना डीजीआरद्वारे मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लातूर जिल्ह्यातील सीएससी केंद्र चालविण्यासाठी इच्छूक असलेल्या माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित, ज्यांना संगणकाचा अनुभव असलेल्यांना डीजीआरच्या https://dgrindia.gov.in/  या संकेतस्थळावर नोंदणी करणे व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांना 4 फेब्रुवारी, 2025 पर्यंत कळवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि) यांनी केले.

अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या 02382-228544 या दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक 9402176303 यावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

*****

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन