शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात मद्यविक्री बंद
शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात मद्यविक्री बंद
लातूर दि. 18: लातूर जिल्ह्यात 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.जयंतीनिमित्त मिरवणुका, मोटार सायकल रॅली व इतर सामाजिक कार्यक्रम खुल्या, मुक्त तसेचनिर्भय वातावरणात, शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्रीअनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर घुगेयांनी दिले आहेत.
मुंबई मद्य निषेध कायदा1949 चे कलम 142 तसेच नमूद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर - घुगे यांनी 19 फेब्रुवारी,2025 रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचेआदेश दिले आहेत.या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करणाऱ्या अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यातयईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment