नेहरू युवा केंद्र लातूर कार्यालयात राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेहरू युवा केंद्र लातूर कार्यालयात
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि.6:- केंद्र शासन व राज्य शासन संयुक्त विद्यमाने
राज्यात ॲग्रीस्टॅक संकल्पनेच्या अंतर्गत डिजिटल क्रॉप सर्वे करण्यात येणार
आहे. या कार्यासाठी नेहरू युवा केंद्र
मार्फत कमीत कमी १५ दिवस व जास्तीत जास्त ३ महिने कालावाधीसाठी प्रति महिना रुपये ५
हजार मानधन तत्वावर राष्ट्रीय युवा स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यातील प्रत्येक
तालुक्यात ३ या प्रमाणे एकूण ३० स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येणार असून या पदांसाठी
किमान पदवी शिक्षण घेत असण्याऱ्या व १ जानेवारी २०२५ रोजी १८ वर्ष पूर्ण व 29
वर्षाच्या आत वय असण्याऱ्या युवा-युवतींनी
nyks.nic.in या संकेतस्थळावर किवा ऑफलाइन पद्धतीने नेहरू युवा केंद्र, लातूर, मध्यवर्तीय प्रशासकीय इमारत दुसरा मजला, दक्षिण
बाजू लातूर येथे ८ फेब्रुवारी, २०२५ पूर्वी आपले अर्ज सादर करावे तसेच अधिक
माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९६६५७९३९६१ वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा युवा
अधिकारी साक्षी समैया यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment