माजी सैनिक, विधवा यांची डीएसडब्ल्यू पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
माजी सैनिक,
विधवा यांची डीएसडब्ल्यू पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर,दि.3: माजी सैनिक, विधवा यांचे
डी.एस.डब्ल्यूच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या पोर्टलवर नोंदणी
करुन घेणे अनिवार्य आहे. सर्व माजी सैनिक संघटना यांनी हे काम आपल्या तालुक्यामध्ये
असलेल्या ई-सेवा केंद्रामार्फत करुन घ्यावे. किंवा ज्यांच्याकडे कॉम्प्युटर आहे ते
घरी सुध्दा नोंदणी करु शकतात. यामध्ये कांही अडचण आल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी
02382-228544 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच दिवसभरात झालेल्या
नोंदणीची एकूण संख्या नोंदणी झालेले माजी सैनिक किती व विधवा किती याची माहिती सैनिक
कल्याण कार्यालय यांना दररोज द्यायची आहे. यापुढे ज्या माजी सैनिक किंवा माजी सैनिक
विधवा यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. केवळ त्यांनाच शासकीय योजनेचा लाभ घेता येणार
आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी जाताना सर्व सैन्य दस्तावेज सोबत घेवून जाणे आवश्यक आहे, असे
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि) यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment