जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटकांचा जिल्हा दौरा
जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटकांचा जिल्हा दौरा
लातूर दि. 24: लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी व कल्याण संघटक ले. कर्नल शरद पांढरे (नि) हे फेब्रुवारी ते मार्च, 2025
मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दौरे करणार आहेत. या दौऱ्या दरम्यान तहसीलदार
यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पातळीवर समितीची बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये आजी,
माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित प्रशासन संबंधित अडीअडचणी यावर संबंधित
विभागाशी सविस्तर चर्चा करण्यात येईल.
रेणापूर तहसील कार्यालय येथे 27 फेब्रुवारी 2025 रोजी 11 वाजता, उदगीर तहसील
कार्यालय येथे 28 फेब्रुवारी 2025 रोजी 11 वाजता, लातूर तहसील कार्यालय येथे 11
मार्च 2025 रोजी 11 वाजता, औसा तहसील कार्यालय येथे 18 मार्च 2025 रोजी 11 वाजता, निलंगा
तहसील कार्यालय 18 मार्च 2025 रोजी 12 वाजता, चाकूर तहसील कार्यालय येथे 21 मार्च
2025 रोजी 11 वाजता, अहमदपूर तहसील कार्यालय येथे 21 मार्च 2025 रोजी 12 वाजता, शिरुर
अनंतपाळ तहसील कार्यालय येथे 25 मार्च 2025 रोजी 11 वाजता, देवणी तहसील कार्यालय येथे
25 मार्च 2025 रोजी 12 वाजता, जळकोट तहसील कार्यालय येथे 28 मार्च 2025 रोजी 11
वाजता या बैठका होतील. तरी सर्व आजी, माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी या दौऱ्याचा
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नलशरद पांढरे (नि)
यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment