महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची 50 टक्के व्याज सवलत योजना

 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास

महामंडळाची 50 टक्के व्याज सवलत योजना

लातूर,31:  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत रक्कमेचा एकरक्कमी भरणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीएस) देण्याबाबत सुधारित एकरक्कमी योजना 31 मार्च 2025 पर्यंत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुनी डालडा फॅक्ट्री कंपाऊंड, शिवनेरी गेटसमोर, लातूर येथे किंवा 02382-253334 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. झुंजारे यांनी केले आहे.

****

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन