सामाजिक न्याय व विशेषस सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठवावेत

 

सामाजिक न्याय व विशेषस सहाय्य विभागाच्या

विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठवावेत

 

 

लातूर, दि. 10 (जिमाका) :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांसह सबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. श्री. हर्षदीप कांबळे व समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

या विविध पुरस्कारांची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. सन 2023-2024 च्या पुरस्कारासाठी पात्रतेचा कालावधी 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 असा विचारात घेतला जाणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार 51 समाजसेवक व्यक्ती व 10 संस्था यांना देण्यात येतो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 25 समाजसेवक व्यक्ती व 6 संस्थांना देण्यात येतो. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, आणि संत रविदास पुरस्कार 1 व्यक्ती व 1 संस्था यांना देण्यात येतो. इच्छुकांनी या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारी, 2025 पर्यंत विहित अर्ज नमुद करण्यात आलेल्या कागदपत्रांसह समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन