भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्ज पडताळणीबाबत आवाहन

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या

अर्ज पडताळणीबाबत आवाहन

लातूर,दि.3:    राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु, जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यंना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृह तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यासाठी http://hams.mahait.org हे नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात ज्या अनुसूचित जाती व नवबौध्द व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी http://hams.mahait.org या पोर्टलवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज भरलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे कार्यालय स्तरावरुन अर्ज तपासणी करण्याची कार्यवाही सुरु असून ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी विद्यार्थ्यांच्या महा-आयटी पोर्टलवरील आय-डीवर सेंन्ट टू ॲप्लीकेंन्ट (रिटर्न) करण्यात आलेले आहेत. तरी विद्यार्थ्यांनी या त्रुटींची पूर्तता करुन त्याची प्रिंट तात्काळ समाज कलयाण सहाय्यक आयुक्त कार्यालयात जमा करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्जाच्या त्रुटीबाबत कोणताही मेसेज आला नाही, अशा विद्यार्थ्यांनी अर्ज पडताळणीसाठी 2 ते 6 फेब्रुवारी, 2025 रोजी पर्यंत कार्यालयातील स्वाधार शाखेस भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन