प्रादेशिक उपायुक्त यांच्या हस्ते सुगम्य यात्रा 2025 या उपक्रमाचे उदघाटन

 प्रादेशिक उपायुक्त यांच्या हस्ते सुगम्य यात्रा 2025 या उपक्रमाचे उदघाटन

 

लातूर, दि.7:- केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी अडथळा विरहीत सुलभ वावर होण्याच्या दृष्टीने 7 फेब्रुवारी,2025 रोजी सुगम्य यात्रा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यामार्फत 7 फेब्रुवारी 2025 रोजी लातूर येथील सिध्देश्वर मंदिर येथे आायोजित सुगम्य यात्रा 2025 या उपक्रमाचे उदघाटन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यंकट लामजने, दिव्यांग कल्याण विभागाचे राजू गायकवाड, बाळासाहेब वाकडे, लातूर शहरातील दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, कर्मचारी व देव दर्शनासाठी आलेले सर्व भाविक भक्त यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमामध्ये अविनाश देवसटवार यांनी लातूर जिल्ह्यातील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर, गंजगोलाई तसेच इतर सर्व मंदिरे, शहरातील शासकीय इमारती, नगर पालिका, महानगर पालिका, सिनेमा गृहे, प्रेक्षणीय स्थळे, ग्रंथालये, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळा विरहीत करण्याच्या दृष्टीने समाजाने संवेदनशील होऊन दिव्यांगासाठी सुलभ व सहज वावर होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.  

दिव्यांग व्यक्ती हा समाजाचा एक अविभाज्य घटक असल्यामुळे त्या घटकास न्याय, समता, समान संधी, संपूर्ण सहभाग हा मिळाला पाहिजे तो मिळवून देण्याचाठी शासन, प्रशासन, सेवाभावी संस्था, समाज व व्यक्ती एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, असे म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचलन राजू गायकवाड यांनी तर आभार बाळासाहेब बाकडे यांनी केले.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन